आतां नकां भरोवरी – संत चोखामेळा अभंग – ५५

आतां नकां भरोवरी – संत चोखामेळा अभंग – ५५

आतां नकां भरोवरी ।
तूं तों उदार श्रीहरी ॥१॥
शरणांगता पायापाशीं ।
अहर्निशी राखावें ॥२॥
ब्रीद गाजे चराचरीं ।
कृपाळु हरि दीनांचा ॥३॥
चोखा म्हणे भरंवसा ।
दृढ सरसा मानला ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां नकां भरोवरी – संत चोखामेळा अभंग – ५५