असेंच करणें होतें – संत चोखामेळा अभंग – ५१

असेंच करणें होतें – संत चोखामेळा अभंग – ५१


असेंच करणें होतें तुला ।
तरी का जन्म दिला मला ॥१॥
जन्म देवोनी सांडिलें ।
कांहो निष्ठुर मन केलें ॥२॥
कोठें गेला माझे वेळीं ।
केलें कोणाचें सांभाळी ॥३॥
चोखा म्हणे देवा ।
नको मोकलूं केशवा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

असेंच करणें होतें – संत चोखामेळा अभंग – ५१