असेंच करणें होतें तुला । तरी का जन्म दिला मला ॥१॥ जन्म देवोनी सांडिलें । कांहो निष्ठुर मन केलें ॥२॥ कोठें गेला माझे वेळीं । केलें कोणाचें सांभाळी ॥३॥ चोखा म्हणे देवा । नको मोकलूं केशवा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.