Skip to content
अवघॆं मंगळ तुमचें – संत चोखामेळा अभंग – ५०
अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम ।
माझा तो श्रम पाहातां जाये ॥१॥
गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा ।
आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥
या परतें मागणें दुजें नाहीं आतां ।
पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥
चोखा म्हणे देवा होउनी उदार ।
ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अवघॆं मंगळ तुमचें – संत चोखामेळा अभंग – ५०