आणिक दैवतें देतीं काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥ तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥ न लगे आटणी तपाची दाटणी । न लगे तीर्थाटणी काया क्लेश ॥३॥ चोखा म्हणे नाम जपतां सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.