अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसां ॥१॥ अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती । विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणीं ॥२॥ कोणीही अंगिकार न करिती माझा । दूर हो जा अवघे म्हणती ॥३॥ चोखा म्हणे तुम्ही घ्याला पदरीं । तरीच मज हरी सुख होय ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.