अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगों ॥१॥ पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥ शेषादिकां जेथें न कळेचि अंत । तेथें ती पतित काय वानूं ॥३॥ चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार । कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.