कर्मातें वाळिलें धर्मातें – संत चोखामेळा अभंग – ४५

कर्मातें वाळिलें धर्मातें – संत चोखामेळा अभंग – ४५

कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें ।
सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥
विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें ।
सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥
वेदातें वाळीलें । शास्त्रातें वाळीलें ।
सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला ।
देहीच भेटला एव आम्हां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कर्मातें वाळिलें धर्मातें – संत चोखामेळा अभंग – ४५