वैकुंठ पंढरी भिंवरेचे – संत चोखामेळा अभंग – ४०
वैकुंठ पंढरी भिंवरेचे – संत चोखामेळा अभंग – ४०
वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं ।
प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रूप हें सांवळें गोड तें गोजिरें ।
धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा ।
वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान ।
विटे समचरण ठेवियेले ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
वैकुंठ पंढरी भिंवरेचे – संत चोखामेळा अभंग – ४०