बहुत हिंडलो देश देशांतर । परी मन नाहीं स्थिर झालें कोठें ॥१॥ बहुत तीर्थें फिरोनियां आलों । मनासवें झालों वेडगळची ॥२॥ बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ॥३॥ चोखा म्हणे पाहतां पंढरी भूवैकुंठ । मनाचे हे कष्ट दूर गेले ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.