पुंडलिकें सूख दाखविलें – संत चोखामेळा अभंग – ३७

पुंडलिकें सूख दाखविलें – संत चोखामेळा अभंग – ३७

पुंडलिकें सूख दाखविलें लोकां ।
विठ्ठल नाम नौका तरावया ॥१॥
जाय पंढरीसी जाय पंढरीसी ।
पाहे विठोबासी डोळेभरी ॥२॥
अवघा पर्वकाळ तयाचिये पायीं ।
नको आणिके ठायीं जाउ वाया ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाभ बांधा गांठीं ।
जावोनिया मिठी पायीं घाला ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पुंडलिकें सूख दाखविलें – संत चोखामेळा अभंग – ३७