अखंड नामाचें चिंतन – संत चोखामेळा अभंग – २३३
अखंड नामाचें चिंतन सर्व काळ ।
तेर्णे सफळ संसार होय जनां ॥१॥
सर्व हें मायीक नाशिवंत साचें ।
काय सुख याचें मानितसां ॥२॥
निर्वाणीं तारक विठोबाचें नाम ।
येणें भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपें दिननिशीं ।
येणें सदा सुखीं होसी जना ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अखंड नामाचें चिंतन – संत चोखामेळा अभंग – २३३