Skip to content
महादोषराशि पापाचे कळप – संत चोखामेळा अभंग – २३२
महादोषराशि पापाचे कळप ।
नामें सुखरुप कलियुगीं ॥१॥
म्हणोनि आळस करुं नका कोणी ।
नाम जपा वाणीं सर्वकाळ ॥२॥
आसनीं शयनीं नामाचा आठव ।
आन ठावाठाव करुं नका ॥३॥
चोखा म्हणे खातां जेवितां वाचे ।
नाम श्रीविठ्ठलाचें उच्चारावें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
महादोषराशि पापाचे कळप – संत चोखामेळा अभंग – २३२