Skip to content
जाणतें असोनी नेणतें – संत चोखामेळा अभंग – ३३
जाणतें असोनी नेणतें पैं झालें ।
सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥
कैसा हा नवलाव सुखाचा पहा हो ।
न कळे ज्याची माव ब्रम्हादिकां ॥२॥
तो हरी समर्थ पंढरीये उभा ।
त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥
चोखा म्हणे आमुचें दिनाचे माहेर ।
तें पंढरपूर भीमातटीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
जाणतें असोनी नेणतें – संत चोखामेळा अभंग – ३३