पाहतां पाहतां वेधियेला – संत चोखामेळा अभंग – ३२२

पाहतां पाहतां वेधियेला – संत चोखामेळा अभंग – ३२२

पाहतां पाहतां वेधियेला जीव ।
सुखाचा सुख सिंधु पंढरीराव ॥१॥
माझा ही मीपणा हरपला जाणा ।
कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥
भवसागराचा दाता ।
विठ्‌ठल विठ्‌ठल वाचे म्हणतां ॥३॥
उभा राहुनि महाद्वारीं ।
चोखा मेळा दंडवत करी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पाहतां पाहतां वेधियेला – संत चोखामेळा अभंग – ३२२