ऊंस डोंगा परी – संत चोखामेळा अभंग – ३२०

ऊंस डोंगा परी – संत चोखामेळा अभंग – ३२०


ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें ।
काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऊंस डोंगा परी – संत चोखामेळा अभंग – ३२०

View Comments

  • ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.डोंगा म्हणजे वाकडा तिकडा ऊस दिसतांना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. रसाची गोडी वाकडी-तिकडी नसून ती चवीला गोड असते.म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये ,फसू नये.
    कमान जरी वेडीवाकडी असली तरी त्यातून सुटणारा तीर, बाण सरळ जातो वेडावाकडा जात नाही.
    नदी जरी वेडीवाकडी वाहत असली तरी त्यातून मिळणारे पाणी हे तहानलेल्या साठी गोडच असते.
    म्हणून संत चोखा मेळा म्हणतात माझी भक्ती जरी वेडीवाकडी वाटली तरी माझा भाव भोळा, आहे सरळ आहे.