नेत्रीं अश्रुधारा उभा – संत चोखामेळा अभंग – ३१९
नेत्रीं अश्रुधारा उभा – संत चोखामेळा अभंग – ३१९
नेत्रीं अश्रुधारा उभा भीमातिरीं ।
लक्ष चरणावरी ठेवोनिया ॥१॥
कांगा मोकलीलें न येसी गा देवा ।
काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥
नेणें करुं भक्ती नेणें करूं सेवा ।
न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥
चोखा म्हणे माझा जीवीचा विसांवा ।
पोकारितों धांवा म्हणोनियां ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
नेत्रीं अश्रुधारा उभा – संत चोखामेळा अभंग – ३१९