Skip to content
बहु कनवाळु होसी – संत चोखामेळा अभंग – ३११
बहु कनवाळु होसी गा देवराया ।
म्हणोनि सखया शरण आलों ॥१॥
निवारीं या तापापासोनी सोडवीं ।
करूणा भाकावी किती तुम्हां ॥२॥
माझीयाचि काजा विलंब दातार ।
कां न करीं त्वरा देवराया ॥३॥
चोखा म्हणे बहु पडिलों काचणी ।
सोडवीं चक्रपाणी वेगीं आतां ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
बहु कनवाळु होसी – संत चोखामेळा अभंग – ३११