बरें हें वाईट आहे – संत चोखामेळा अभंग – ३१०
बरें हें वाईट आहे – संत चोखामेळा अभंग – ३१०
बरें हें वाईट आहे माझे भाळीं ।
तें सुखें हो वळी जीवें माझ्या ॥१॥
आतां कोणावरी रुसों नये देवा ।
भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥
आहे जें संचित तैसें होत जात ।
वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥
चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे ।
झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
बरें हें वाईट आहे – संत चोखामेळा अभंग – ३१०