सुखाचिया लागीं करितों – संत चोखामेळा अभंग – ३०९
सुखाचिया लागीं करितों – संत चोखामेळा अभंग – ३०९
सुखाचिया लागीं करितों उपाव ।
तों अवघेंचि वाव दिसों येतें ॥१॥
करितां तळमळ मन हें राहिना ।
अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेंचि साकडें दिसोनियां आलें ।
न बोलवें तें भलें कोणा पुढें ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलों गुर्हाडीं ।
सोडवी तातडी यांतूनियां ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सुखाचिया लागीं करितों – संत चोखामेळा अभंग – ३०९