धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥ कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कां हो न ये दया माझी तुम्हां ॥२॥ बाळकाचे परी लडिवाळपणें । तुमचें पोसणें मी तो देवा ॥३॥ चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां । काय आमुची कथा आतां चाले ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.