वारंवार किती करुं – संत चोखामेळा अभंग – ३०५
वारंवार किती करुं – संत चोखामेळा अभंग – ३०५
वारंवार किती करुं करकर ।
माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥
न बोलावें आतां हेंचि शहाणपण ।
होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥
केव्हां तरी आम्हां होईल आठव ।
हाचि एक भाव धरुं आतां ॥३॥
चोखा म्हणे मग येशील गिवसित ।
तोंवरी हें चित्त दृढ करुं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
वारंवार किती करुं – संत चोखामेळा अभंग – ३०५