Skip to content
समर्थांसी रंकें शिकवण – संत चोखामेळा अभंग – २९९
समर्थांसी रंकें शिकवण जैशी ।
माझी वाणी तैशी बडबड ॥१॥
शुभ हें अशुभ न कळे बोलतां ।
परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥
उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान ।
तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥
चोखा म्हणे एका घासाची चाकरी ।
करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
समर्थांसी रंकें शिकवण – संत चोखामेळा अभंग – २९९