Skip to content
नेणो तुमचें मन – संत चोखामेळा अभंग – २९८
नेणो तुमचें मन कठिण कां झालें ।
मज कांहीं न कळे पूर्वकर्म ॥१॥
किती आठवण मागिलाचि करुं ।
तेणें पडे विचारु पुढीलासी ॥२॥
आतां अवघड दिसतें कठीण ।
मताचें हें मन चिताडोहीं ॥३॥
चोखा म्हणे काय करुं तें आठवेना ।
निवांत वासना कई होय ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
नेणो तुमचें मन – संत चोखामेळा अभंग – २९८