कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झाला तुम्ही ॥१॥ मी तो कळवळोनी मारितसे हाक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥ बोलोनी उत्तरें करीं समाधान । येवढेंचि दान मज द्यावें ॥३॥ चोखा म्हणे माझी पुरवावी आस । न करीं उदास माझे माये ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.