आतां याचा अर्थ – संत चोखामेळा अभंग – २९१

आतां याचा अर्थ – संत चोखामेळा अभंग – २९१


आतां याचा अर्थ पुरे पुरे देवा ।
येऊं द्या कनवळा तुम्हांलागीं ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी ।
माझें तो हरि कांहीं न चाले ॥२॥
वारंवार करुणा करितों देवराया ।
कां न ये कनवळा तुम्हांलागीं ॥३॥
चोखा म्हणे आतां न करा उदास ।
पुरवावि आस मायबाप ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां याचा अर्थ – संत चोखामेळा अभंग – २९१