Skip to content
श्रीमुख चांगले कांसे – संत चोखामेळा अभंग – २९
श्रीमुख चांगले कांसे पितांबर ।
वैजयंती हार रूळे कंठी ॥१॥
तो माझ्या जीवीचा जिवलग सांवळा ।
भेटवा हो डोळां संतजन ॥२॥
बहुतांचें धावणें केलें नानापरी ।
पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥
चोखा म्हणे वेदशास्त्रांसी जो साक्षी ।
तोचि आम्हा रक्षी नानापरी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
श्रीमुख चांगले कांसे – संत चोखामेळा अभंग – २९