संत चोखामेळा अभंग

काळाचा विटाळ जीवशिवा – संत चोखामेळा अभंग – २८५

काळाचा विटाळ जीवशिवा – संत चोखामेळा अभंग – २८५

काळाचा विटाळ जीवशिवा अंगी ।
बांधलासे जगी दृढ गांठी ॥१॥
विटाळीं विटाळ चवदाही भुवनें ।
स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥
सुखासी विटाळ दुःखासी विटाळ ।
विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥
विटाळाचें अंगी विटाळाचे फळ ।
चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काळाचा विटाळ जीवशिवा – संत चोखामेळा अभंग – २८५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *