वेदासी विटाळ शास्‍त्रासी – संत चोखामेळा अभंग – २८३

वेदासी विटाळ शास्‍त्रासी – संत चोखामेळा अभंग – २८३


वेदासी विटाळ शास्‍त्रासी विटाळ ।
पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ ।
काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रह्मीया विटाळ विष्णूसी विटाळ ।
शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ ।
चोखा म्हणे विटाळ आदिअंतीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वेदासी विटाळ शास्‍त्रासी – संत चोखामेळा अभंग – २८३