संत चोखामेळा अभंग

नीचाचे संगती देवो – संत चोखामेळा अभंग – २८२

नीचाचे संगती देवो – संत चोखामेळा अभंग – २८२


नीचाचे संगती देवो विटाळला ।
पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥
मुळींच सोंवळा कोठें तो वोवळा ।
पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥
सोंवळ्यांचे ठाईं सोंवळा आहे ।
वोवळ्या ठाईं वोवळा कां न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा ।
तोचि म्यां देखिला दृष्‍टीभरी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नीचाचे संगती देवो – संत चोखामेळा अभंग – २८२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *