अखंड समाधी होउनी – संत चोखामेळा अभंग – २७८
अखंड समाधी होउनी – संत चोखामेळा अभंग – २७८
अखंड समाधी होउनी ठेलें मन ।
गेलें देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणें न मोडे समाधी ।
तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालतां बोलतां न मोडे समाधी ।
मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा ।
जाणें तो विरळा लक्षामाजी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अखंड समाधी होउनी – संत चोखामेळा अभंग – २७८