सकळा आगराचें जें मूळ । तोहा सोज्वळ विठू माझा ॥१॥ वेदांचा विचार शास्त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥ कैवल्य देखणा सिद्धांचा जो राणा । भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥ चोखा म्हणे माझ्या ह्रुदयीं बिंबला । त्रिभुवनीं प्रकाशला विठू माझा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.