Skip to content
श्रवणाचें श्रवण घ्राणाचें – संत चोखामेळा अभंग – २७५
श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण ।
रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥
वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी ।
इंद्रियांची राहाटी विठ्ठल माझा ॥२॥
प्राण जेणें चळे मन जेणें वोळे ।
शून्यातें वेगळें विठ्ठल माझा ॥३॥
आनंदीं आनंद बोधा जेणें बोध ।
सकळां आत्मा शुद्ध विठ्ठल माझा ॥४॥
मुळाचें निजमूळ अकुळाचें कुळ ।
चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
श्रवणाचें श्रवण घ्राणाचें – संत चोखामेळा अभंग – २७५