Skip to content
देहीं देखिली पंढरी – संत चोखामेळा अभंग – २७३
देहीं देखिली पंढरी ।
आत्मा अविनाश विटेवरी ॥१॥
तोहा पांडुरंग जाणा ।
शांति रुक्मिणि निजांगना ॥२॥
आकारलें तितुकें नासे ।
आत्मा अविनाश विठ्ठल दिसे ॥३॥
ऐसा विठ्ठल ह्रुदयीं ध्यायीं ।
चोखामेळा जडला पायीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
देहीं देखिली पंढरी – संत चोखामेळा अभंग – २७३