Skip to content
कर्मातें वाळिलें धर्मातें – संत चोखामेळा अभंग – २७२
कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें ।
सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥
विधीतें वाळिलें निषेधा गिळिले ।
सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥
वेदातें वाळिलें । शास्त्रातें वाळिलें ।
सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला ।
देहींच भेटला देव आम्हां ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कर्मातें वाळिलें धर्मातें – संत चोखामेळा अभंग – २७२