देहबुद्धीवेगळें जें आकारलें – संत चोखामेळा अभंग – २७१
देहबुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥ देव पहा तुम्हीं देव पहा तुम्हीं । देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥ उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्या भक्तानें देव ग्रासिला ॥३॥ चोखा म्हणे नागवें उघडें झालें एक । सहज मीपण देख मावळलें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
देहबुद्धीवेगळें जें आकारलें – संत चोखामेळा अभंग – २७१