आमुचा आम्हीं केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला ॥१॥ भावचि कारण भावचि कारण । भावें देव शरण भाविकासी ॥२॥ निज भावबळें घातिलासे वेढा । देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥ चोखा म्हणे देव भावाचा बांधला । भक्ताचा अंकित म्हणूनी झाला ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.