फुलाचे अंगी सुवास – संत चोखामेळा अभंग – २६९
फुलाचे अंगी सुवास – संत चोखामेळा अभंग – २६९
फुलाचे अंगी सुवास असे ।
फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥
मृतिकेचे घट केले नानापरी ।
नाव ठेविलें रांजण माथण घागरी ॥२॥
विराली मृत्तिका फुटलें घट ।
प्राणी कां फुकट शोक करी ॥३॥
चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाहीं ।
विवेकी तये ठायीं न गुंतेची ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
फुलाचे अंगी सुवास – संत चोखामेळा अभंग – २६९