देवा नाहीं रुप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठायी ॥१॥ डोळियाचा डोळा दृष्टीच भासला । देव प्रकाशला आदि अंतीं ॥२॥ नवल वाटलें नवल वाटलें । देव कोंदाटले मागें पुढें ॥३॥ चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देव प्रगटला देहामाजी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.