Skip to content
आजि दिवस धन्य – संत चोखामेळा अभंग – २६३
आजि दिवस धन्य सोनियाचा ।
जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥
तेणें सुख समाधान झाली विश्रांती ।
दुजे नाठवती चित्तीं कांहीं ॥२॥
समाधानें जीव राहिला निश्चळ ।
गेले हळहळ त्रिविधताप ॥३॥
चोखा म्हणे आनंद वाटलासे जीवा ।
संतांचे पाय केशवा देखियेले ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आजि दिवस धन्य – संत चोखामेळा अभंग – २६३