विठ्‌ठल विठ्‌ठल गजरीं – संत चोखामेळा अभंग – २६०

विठ्‌ठल विठ्‌ठल गजरीं – संत चोखामेळा अभंग – २६०विठ्‌ठल विठ्‌ठल गजरीं ।


अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर ।
दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरी कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विठ्‌ठल विठ्‌ठल गजरीं – संत चोखामेळा अभंग – २६०