सर्वही सुखाचें वोतिलें – संत चोखामेळा अभंग – २६
सर्वही सुखाचें वोतिलें – संत चोखामेळा अभंग – २६
सर्वही सुखाचें वोतिलें श्रीमुख ।
त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥
कर दोन्हीं कटीं सम पाय विटे ।
शोभले गोमतें बाळरूप ॥२॥
जीवाचें जीवन योगियांचे धन ।
चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सर्वही सुखाचें वोतिलें – संत चोखामेळा अभंग – २६