कोणासी साकडें गातां – संत चोखामेळा अभंग – २५३कोणासी साकडें गातां रामनाम वाचे ।
होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार ।
नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशीं वसे नामापाशीं ।
ऐसी साक्ष देती वेदशास्त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार ।
राम हा निर्धार जप करीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कोणासी साकडें गातां – संत चोखामेळा अभंग – २५३