अवघा आनंदा राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥ हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणीक साचार दुजें नाहीं ॥२॥ काम क्रोधांचें न पडती आघात । वाचे गातां गीत रामनाम ॥३॥ चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.