Skip to content
अवघें मंगळ तुमचें गुण – संत चोखामेळा अभंग – २४८
अवघें मंगळ तुमचें गुण नाम ।
माझा तो श्रम पाहतां जाये ॥१॥
गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा ।
आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥
यापरतें मागणें दुजें नाहीं आतां ।
पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥
चोखा म्हणे देवा होउनी उदार ।
ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अवघें मंगळ तुमचें गुण – संत चोखामेळा अभंग – २४८