Skip to content
शुद्ध भाव शुद्धमती – संत चोखामेळा अभंग – २४३
शुद्ध भाव शुद्धमती ।
ऐसें पुराणें वदती ॥१॥
जयासाठीं जप तप ।
तोहा विश्वाचाचि बाप ॥२॥
नामें पातकीं तरिलें ।
जड जीवा उद्धरिलें ॥३॥
विश्वास दृढ धरा मनीं ।
चोखा मिठी घाली चरणीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
शुद्ध भाव शुद्धमती – संत चोखामेळा अभंग – २४३