नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥ तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपे आधीं ॥२॥ नेम धर्म कांहीं नलगे साधन । सुखें नारायण जप करीं ॥३॥ चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.