हीन याती माझी – संत चोखामेळा अभंग – ३२५

हीन याती माझी – संत चोखामेळा अभंग – ३२५


हीन याती माझी देवा ।
कैसी घडे तुझी सेवा ॥१॥
मज दूर दूर हो म्हणती ।
तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥
माझा लागतांचि कर ।
सिंतोडा घेताती करार ॥३॥
माझ्या गोविंदा गोपाळा ।
करुणा भाकी चोखामेळा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हीन याती माझी – संत चोखामेळा अभंग – ३२५

View Comments

  • हीन याती माझी देवा म्हणजे, मी क्षुद्र जातीचा आहे देवा आणि त्यामुळे तुझी सेवा कसी करू . कारण मि महार असल्यामुळे सगळे मला लांब हा म्हणतात जवळ सुद्धा थांबुन देत नाहीत मग हे असच चालू राहिला तर मी तुला कस भेटू .
    माझा जर हात लागला किंवा स्पर्श झाला तर विटाळ झाला म्हणतात आणि गोमूत्र शिंपडतात . आणि त्यामुळे माझ्या गोविंदा गोपाळा तुला माझी करुणा येऊदे अस श्री संत चोखामेळा भगवंताला विनवणी करतात .