हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥ मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥ माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥ माझ्या गोविंदा गोपाळा । करुणा भाकी चोखामेळा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
हीन याती माझी – संत चोखामेळा अभंग – ३२५
1 thought on “हीन याती माझी – संत चोखामेळा अभंग – ३२५”
Rahul Dutal
हीन याती माझी देवा म्हणजे, मी क्षुद्र जातीचा आहे देवा आणि त्यामुळे तुझी सेवा कसी करू . कारण मि महार असल्यामुळे सगळे मला लांब हा म्हणतात जवळ सुद्धा थांबुन देत नाहीत मग हे असच चालू राहिला तर मी तुला कस भेटू .
माझा जर हात लागला किंवा स्पर्श झाला तर विटाळ झाला म्हणतात आणि गोमूत्र शिंपडतात . आणि त्यामुळे माझ्या गोविंदा गोपाळा तुला माझी करुणा येऊदे अस श्री संत चोखामेळा भगवंताला विनवणी करतात .