संत चोखामेळा अभंग

कोणी पंढरीसी जाती – संत चोखामेळा अभंग – २२५

कोणी पंढरीसी जाती – संत चोखामेळा अभंग – २२५

कोणी पंढरीसी जाती वारकरी ।
तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥
आनंदें तयांसी भेटेन आवडीं ।
अंतरींची गोडी घेईन सुख ॥२॥
ते माझे मायबाप सोयरे सज्जन ।
तयां तनु मन वोवाळीन ॥३॥
चोखा म्हणे तें माहेर निजाचें ।
जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कोणी पंढरीसी जाती – संत चोखामेळा अभंग – २२५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *